Breaking News
बदनापूर तालुका

बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.!

तहसीलदार यांना निवेदन सादर!
बदनापूर प्रतिनिधी / किशोर सिरसाठ
: बदनापूर तालुक्यात आतिउष्टी झाल्यालेने पिकांची अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे बहुतांश शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह हा शेतीवर आधारित असून आज त्याचे हाताशी आलेले पीकची आतिउष्टीने नासाडी केली आहे म्हणूनच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याबाबत तहसीलदार यांनी शेतकऱ्याच्या पिकाची पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.


सततच्या पावसामुळे तालुकासह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती व ओला दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे यात अनेक कुटुंब उघड्यावर आलेले आहेत अनेक शेतकऱ्यांचे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झालेले आहे.मका, कपाशी, उडीद, मूग,सोयाबीन, बाजरी,ज्वारी, तसेच फळबाग, खरीप हंगाम आहे पूर्णपणे अतिवृष्टीमुळे अतिपावसामुळे वाया गेलेले आहे.यामुळे शेतकरी प्रचंड मेटाकुटीस आलेला आहे गेल्या चार महिन्यापासून कोरोणा संसर्गजन्य रोगामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल झालेला आहे.


शेतकरी राजा पूर्ण पणे भरडल्या गेला आहे आर्थिक दृष्ट्या चिंतेत आहे करिता शासनाने याची दखल घेऊन त्वरित अतीवॄष्टी झालेल्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी 1,00000 लाख रुपये मदत जाहीर करावी व संबंधित अधिकाऱ्यांने पंचनामे करून शासकीय लेव्हलवर कार्य करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी व निवेदन किसान करणे सेना यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर केले.

बदनापूर येथे किसान करणी सेना युवा मोर्चाच्या माध्यमातून तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले किसान करणी सेना युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष जयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष अरुण खोकड यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक