Breaking News
भोकरदन तालुका

भोकरदन येथील स्मशानभूमीची दुरवस्था, दुरुस्ती करण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे. तसेच वेगवेगळ्या सोयीसुविधाचा अभाव आहे. यामध्ये स्मसनवट्याची दुरुवस्था झाले आहे,पाणी साठवणुकीसाठी असलेला हौदाची दुरवस्था, नदीच्या कडेला असलेली सुरक्षा भिंत कोसळली असल्याने तेथेही धोका निर्माण झाला आहे. तसेच स्मशानभूमीत स्वच्छतेचा आणि साफसफाईचा अभाव असल्याने येथे दुर्गंधी पसरत असल्याबाबत शहरातील सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

  प्रतिक्रिया : भोकरदन शहरातील सार्वजनिक दुरवस्था पाहता लक्षात येते की इथे नगर परिषद भोकरदन चे दुर्लक्ष आहे.अंत्यविधी साठी आलेल्या नागरिकांना खूप परिश्रम सोसावे लागते हे मिस्वताः अनुभवले आहे. माणूस ज्या वेळेस अनंतात विलीन होतो तेव्हाही त्याची अवहेलना होते आहे.स्मशान भूमीचे छत उघडे असल्या मुळे पावसाळ्यामध्ये अंत्यविधी साठी पावसाची खूप मोठी समस्या निर्माण होते. न. प. भोकरदन ने या कडे लक्ष देण्याची खूप गरज आहे.
सामाजिक कार्यकर्ते -विकास जाधव

भोकरदन येथिल स्मशानमुमचे नदीच्या साईटने आशा प्रकारे भिंती पडत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक