मंठा तालुका

शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार- आ.राजेश राठोड

न्यूज जालना/ मंठा प्रतिनिधी दि २७- चंदन लागवड सोयाबीन क्लस्टर सिताफळ लागवड दुध क्लस्टर या माध्यमातून केवळ मंठा आणि परतूर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असा निर्धार आमदार राजेश राठोड यांनी व्यक्त केला

मंठा येथील पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये व्यंकटेश्वरा प्रोड्युसर कंपनी लातूर यांच्यावतीने गुरुवार ता 27 रोजी आयोजित शेतकरी बांधवांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात आमदार राजेश राठोड बोलत होते व्यासपीठावर कंपनीचे रिजनल डायरेक्टर सॅंडल सोसायटी ऑफ इंडिया किशोर राठोड व्यंकटेश्वरा प्रोडूसर कंपनीचे संचालक अंकुश चव्हाण राष्ट्रपती प्रगतिशील शेतकरी लहूराव देशमुख बी डी पवार पंचायत समितीचे माजी उपसभापती कल्याणराव खरात बाजार समितीचे माजी संचालक शरद बोराडे परतूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अंकुश गुंजकर मंठा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी सुरडकर डॉ संदीप चव्हाण ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार पंकज ढाकणे परेश पाटील सचिन राठोड यांची उपस्थिती होती

कंपनीचे रिजनल डायरेक्टर किशोर राठोड यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की चंदन लागवडी संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकरी चंदन लागवड करण्याकडे दुर्लक्ष करतात चंदन लागवडीचे फायदे या संदर्भात त्यांनी विस्तृत स्वरूपात मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना आमदार राजेश राठोड यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न व्हावे त्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध व्हावे यासाठी परतूर मंठा तालुक्यात यापूर्वी सिताफळ लागवड सोयाबीन प्लास्टर दुध क्लस्टर आदीबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे

याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे यापुढे चंदन लागवडी संदर्भात शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या माध्यमातून तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले या माध्यमातून शेतकऱ्यांना रोजगार व स्वतः पायावर उभे राहण्याची ताकद निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले मागील पाच ते सात वर्षांपासून मंठा परतूर तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत शेतकरी बांधव अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत असे सांगताना आमदार राजेश राठोड यांच्या डोळ्यात अश्रू तरळले स्थानिक विकास निधीतून दोन अध्यावत रुग्णवाहिकेचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली

यावेळी व्यंकटेश्वरा प्रोडूसर कंपनीचे संचालक अंकुश चव्हाण गटविकास अधिकारी अंकुश गुंजकर यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राठोड तर आभार बी डी पवार यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक