बदनापूर तालुका

मा. आ.सांबरे यांच्या पुढाकाराने अखेर तो गुन्हा दाखल

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ दि 27
बदनापूर तालुक्यातील अकोला येथील एका 16 वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मोटो कार्लो कंपनी व आर एन ट्रँगल कंपनीच्या सहा जणांवर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याविषयी माहिती अशी की दिनांक 30 जुलै 2020 रोजी अकोला तालुका बदनापुर येथील दीपक पांडुरंग केकान वय 16 या मुलाचा दुधना नदी च्या पात्रातील खड्ड्यामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला होता या मुलाने दहावीच्या परीक्षेत यावर्षी चांगले यश संपादित केले होते त्यामुळे या मुलाच्या मृत्यूबाबत या परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात होती माजी आमदार संतोष सांबरे यांनी या मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते त्यावेळी या मयत मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार संतोष सांबरे यांच्याकडे केली होती

तसेच या मुलाचे वडील व ग्रामस्थांनी दुधना नदी समृद्धी महामार्गासाठी खोदकाम करून मुरूम रेती घेऊन मोठमोठे खड्डे झालेले आहे हे खड्डे करणाऱ्या संबंधित गुत्तेदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली होती. तीन दिवसापूर्वी माजी आमदार संतोष सांबरे यांनी अकोला चे ग्रामस्थ व शिवसेनेचे भानुदास घुगे ता प्रमुख जयप्रकाश चव्हाण, भाऊसाहेब घुगे,कैलास चव्हाण महादू गिते राजू थोरात व पदाधिकारी यांच्यासह प्रथम बदनापूर पोलीस व नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती या सर्व पाठपुराव्यानंतर अखेर दिनांक 26 ऑगस्ट रोजी बदनापूर पोलिसांनी या मुलाचे वडील पांडुरंग श्रीहरी केकान यांची फिर्याद घेतली त्यामध्ये पांडुरंग केकान यांनी अकोला येथील गायरान मुरूम व रेती करिता समृद्धीच्या कामासाठी मोटो कार्लो व आर एन टंगल कंपनीच्या लोकांनी केले असल्याचे मला गावातील लोकांकडून समजले त्यामुळे माझ्या मुलाच्या मृत्यजबाबदार असणार्‍या संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली सदर फिर्यादीवरून मोटो कार्लो कंपनीचे ब्रिजेश पटेल, सी पी एम अनिल कुमार ,जगदीश सिंग , आर एन ट्रँगल कंपनीचे किशोर वीरजी, भवन रंगानी ,जयकृष्ण कक्कड कार्यालय निधोना तालुका जिल्हा जालना यांच्याविरुद्ध कलम 304 34 भादवि स ह कलम तीन व चार गंठण एक कायदा प्रमाणे बदनापूर पोलीस ठाण्यात दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक