Breaking News
जालना जिल्हा

जालन्यात आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन


न्यूज जालना दि २७

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन अभाविप महाराष्ट्रभर विविध विद्यापीठांचे कुलगुरू, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र भर मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट २०२० रोजी अभाविप धुळे शाखेचे कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट पालकमंत्री यांनी टाळली. म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पालकमंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस प्रशासनाने अमानुषपणे लाठीमार व बुक्यांचा मारा केला. ह्या निषेधार्थ जालन्यात अभाविप कडून आ अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे जालन्यात चमन येथे प्रतिकात्मक दहन करण्यात आले

अभाविप या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करते व तसेच ज्यावेळी पोलिसांनी निर्दयी पणे लाठीमार व बुक्यांचा मारा विद्यार्थ्यांवर केला. त्यावेळी आलिशान कार मध्ये बसून बघ्याची भूमिका घेणाऱ्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे वचन देऊन नापास करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी अभाविप कडून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा संयोजक विक्रम राऊत, शहर मंत्री अनिकेत शेळके,आकाश चाफाकानडे, वेदांत खैरे, प्रथमेश कुलकर्णी, श्रेया चंदन,किशोर मोरे, रसिका जोशी, संध्या जंगडे,केतकी कोळेश्वर,समाधान कुबेर,करण लकडे, अमीत आर्य, राजु कोल्हे, मदन कोल्हे, अविष्कार इंगळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक