Breaking News
मंठा तालुका

तळणीत अतिक्रमण काढल्यानंतरही बस स्टॅन्ड भागात वाहतूक कोंडी कायम

दुजाभाव : कुठे १५ मीटर तर कुठे १० मीटरपर्यंत अतिक्रमण काढले !

न्यूज तळणी( ता मंठा ) दि २८: शेगाव – पंढरपूर या दिंडी महामार्गाची कामे नियमबाह्य व दर्जाहिन सुरू आहे . तळणी बस स्टॅड भागात रुंदीकरण्यासाठी कुठे १५ मीटर तर कुठे १० मीटर अतिक्रमण काढण्यात आले असून सिमेंट रस्ता केवळ ७ मीटर बनविण्यात आल्याने वाहतूक कोंडी कायम आहे . त्यातच रस्त्यावरील हातगाडे, पानटपऱ्याधारकानी अतिक्रमण केले . अरूंद सिमेंट रस्ता कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढणार आहे .

मंठा तालुक्यातील तळणी हे सर्वात मोठी बाजारपेठ आहे . येथे परिसरातील २५ गावातील लोक विविध कामासाठी दररोज येत असतात. तळणी बस स्टॅन्ड भागात कायम गर्दी असते . त्यामूळे बस स्टॅन्ड चौकात रस्त्याच्या मध्यापासुन दोन्ही बाजूनी १५ मीटर पर्यंत अतिक्रमण काढून रस्ता रूंदीकरण होणे गरजेचे होते . मात्र, संबंधित कंपनीने खोदकाम व मुरूम भरण्याचे काम स्थानिक गुत्तेदाराना दिले .

त्यामुळे कुठे १५ मीटर तर कुठे १२ मीटरपर्यंत अतिक्रमण काढण्यात आले . रस्त्याच्या मध्यपासुन १ मीटर डिव्हाडर, ७ मीटरपर्यंत सिमेंट रस्ता, २ मीटर गट्टू रस्ता व १ मीटर नाल्याचे काम असे १२ मीटरमध्ये उरकण्यात येणार आहे. राजकीय समर्थकांचे अतिक्रमण वाचविण्यासाठी सिमेंट रस्ताचा मध्य कुठे एक तर कुठे दोन मीटरने सरकविण्यात आला असून बस भागात सिमेंट रस्त्याची उंची कुठे कमी तर कुठे जास्त ठेवण्यात आल्याने व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले.

डिव्हाडरमध्ये संरक्षण जाळी, पथदिवे खांब, मूख्य महामार्गाला जोडणारे रस्ते, गट्टू बसविण्याचे काम, नाल्याचे कामे स्थानिक गुत्तेदाराकडून करून घेतली जात असल्याने कामांचा दर्जा घसरला आहे . त्यामुळे बस स्टॅन्ड भागातील कामे नियमबाहय व दर्जाहिन होत असून सदर कामावर अप्रशिक्षित मंजूरवर्ग आहे . या कामावर कंपनीचे किंवा एमएसआरडीसीचे इंजिनिअर दिसून येत नसल्याचा आरोप व्यापाऱ्याकडून होत आहे .

प्रत्यक्ष पाहणी करण्याचा सुचना – माजी मंत्री लोणीकर एमएसआरडीसीचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याचा सुचना दिल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले .

एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी सांगितले , या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून सर्व कामांची चौकशी केली जाणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक