Breaking News
जालना जिल्हा

उध्दव ठाकरे व संजय जाधव यांच्यात 20 मिनिटे गुफ्तगू

न्यूज जालना ब्युरो दि २८ :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दादागिरीच्या निषेधार्थ राजीनाम्याचे हत्यार उपसून एल्गार पुकारलेल्या खा. संजय जाधव यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.27) मुंबईत पाचारण केले होते. त्याप्रमाणे वर्षा या शासकीय निवासस्थानी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ठाकरे यांची जाधव यांनी भेट घेतली. तब्बल 20 मिनिटे या दोघांतच गुफ्तगू झाले. त्यातून ठाकरे यांनी जाधव यांचा विविध विषयांच्या अनुषंगाने आश्‍वाशित केले आहे.यावेळी खा. जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींच्या एकतर्फी निर्णयप्रक्रियेसह दादागिरीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. शिवसैनिकांना न्याय द्यावयाचा असेल, तर सत्ता स्थानांमध्ये प्रतिनिधीत्व द्यावेच लागेल. त्यामुळेच भागिदारी असलीच पाहिजे, अशी भूमिकाही जाधव यांनी मांडली. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीच्या प्रशासकीय मंडळास सहा महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. आता पुढील सहा महिन्याचा कालावधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तेंव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या शब्दावर आपला पूर्णतः विश्‍वास आहे, असे स्पष्ट केले. यावेळीच आपण परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय प्रामुख्याने मांडला. या विषयात ठोस हालचाली होत नसल्याबद्दल  जाधव यांनी खंत व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक