परतूर तालुका

विद्यार्थ्यांनाची शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी होतेय पायपीट.

दिपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क दि २८
 शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. प्रशासनानी ते तात्काळ ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे


देशात व राज्यात कोरोनाच्या संकटामुळे राज्यात शेक्षणिक प्रवेश प्रक्रिया आतापर्यंत बंद होती. ती हळूहळू सुरू झाली आहे. त्यासाठी विध्यर्थ्यांना प्रवेश प्रक्रियासाठी लागणारे जात प्रमाणपत्र , रहिवाशी प्रमाणपत्र नोन क्रिमिलेयर प्रमाणपत्र , उत्पन्न प्रमाणपत्र व संबधीत सर्व प्रमाणपत्रे याची आवश्यकता भासता आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्जं करून कागदपत्रे दिली जातात. परंतु त्यात काही जाचक अटी टाकून ते प्रमाणपत्रे त्रुटीमध्ये टाकले जातात व योगे वेळी व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे उपलब्ध होत नसल्याने त्यांना उपविभागीय कार्याल्याकडे चकरा मारावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक मानसिक त्रास आपल्या कार्याल्याकडून होत आहे.

विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करून शैक्षणिक लागणारे  प्रमाणपत्राची जाचक अटी कमी करून तत्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे.महा इ सेवा केंद्रावर प्रमाणपत्राची लागणार्‍या पैशाचे दरपत्रक दर्शनीय भागात लावण्याचे शक्ति करावी. तसेच प्रमाणपत्र ऑनलाइन केल्या नंतर पावती दिली जात नाही. यासाठी प्रशासनानी ते तात्काळ ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे भारीप बहुजन महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष अच्युत पाईकराव यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

या निवेदनावर युवक जिल्हाध्यक्ष अच्युत पाईकराव,सुदाम मस्के, सुभाष ठोके, सुरेश तायडे,गौतम खंडागळे, निवृती पाईकराव,प्रदीप तायडे,विकास कांबळे,हेमंत पहाडे, यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक