Breaking News
घनसावंगी तालुका

घनसावंगी :पिंपरखेड बु मध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि २८ घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु येथे एकाच कुटुंबातील दोन जणांचा अहवाल शुक्रवारी केलेल्या अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आला आहे. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी १४ जणांच्या अँटीजण चाचण्या घेण्यात आला यात पिंपरखेड बु येथील एक दांपत्य पॉझिटिव्ह आढळून आले आहे यात ३९ वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. सध्या घनसावंगी तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या १९३ वर पोहचली आहे तर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही २० वर गेली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ नागेश सावरगावकर यांनी  न्यूज जालना लाइव्ह शी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक