जाफराबाद तालुकाशेतीविषयक

सातेफळ येथे एकात्मिक किड नियंत्रणाचे धडे

न्यूज जालना/बि. डी.सवडे

जाफ्राबाद  तालुक्यातील सातेफळ येथे समर्थ कृषि महाविद्यालयाच्या कृषिदुतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन एकात्मिक किड नियंत्रण करण्याबाबत धडे दिले व त्याचे महत्त्व पटवून दिली.   

यावेळी कृषिदुतांनी एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे किड नियंत्रणाच्या सर्व पद्धतींचा एकत्रित वापर करुन किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आणणे.या पद्धतीचा वापर करुन आपण कीड,रोग,तणे इ.चा प्रभावीपणे नायनाट करु शकतो आणि पर्यारणाचा समतोल कायम ठेवू शकतो.एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये पुढील बाबींचा समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे.कीड व रोगांची नियंत्रणापूर्वी ओळख करुन घेणे,वेळीच योग्य आंतरमशागत करणे,पिकांची फेरपालट,पेरणीच्या वेळेत बदल,शेतामध्ये स्वच्छता मोहीम राबविणे,मातीचे निर्जन्तुकीकरण करणे,क्रायसोपा,लेडिबर्ड भुंगेरे,ट्रायकोग्रामा यांसारख्या परभक्षी किटकांचाही वापर करु शकतो,याविषयी माहिती सांगितली.   

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे,रावे समन्वयक  प्रा मोहजीतसिंग राजपूत,वनस्पतिरोगशास्त्र विभाग प्रमुख प्रा प्रा.पुरुषोत्तम चेके प्रा. शूभम काकड ,कीटकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विलास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमात कृषिदूत सचिन बनकर,संदेशकुमार कायंदे हे हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक