घनसावंगी तालुका

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची कुंभार पिंपळगावात जयंती साजरी.

कुंभार पिंपळगाव / प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील देवी रेणुका माध्यमिक विद्यालय,देवी दहेगाव (ता.घनसावंगी) या शाळेत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात अाली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मु.अ.अार्दड अार.अाय.हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणुन क्रीडा शिक्षक लष्कर व्ही.डी.हे उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात अाले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जिवन कार्याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक