Breaking News
परतूर तालुका

परतूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर

शुक्रवारी एकाच दिवशी पंधरा रुग्णांची भर

दीपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क


परतूर तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्येत दिवसनदिवस वाढ होताना दिसत आहे. तालुक्यातील नागरिकांना कोरोणा विषयी गांभीर्य राहिलेले दिसत नाही. असेच म्हणावे लागेल तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या ही दोनशेच्या उंबरठ्यावर आलेली असतानाही नागरिक सोशल डिस्टन पाळताना तालुक्यात दिसत नाही

नुकताच झालेल्या पोळा गणपती आणि महालक्ष्मी निमित्त तालुक्यातील बाजारपेठेतपण तोबा गर्दी पाहायला मिळाली यात सोशल डिस्टंनसिंनचा फज्जा अक्षरशः उडालेला होता.

यातच शुक्रवारी एकाच दिवशी परत नवीन पंधरा कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे .

याबरोबरच परतूर तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 196, बरे होऊन घरी गेलेले 155, मृत्यू 05 तर ऍक्टिव्ह असलेले उपचार घेत असलेले एकूण रुग्ण 36 आहेत. दिवसभरात सातोना येथे शुक्रवारी रोजी झालेल्या अँटीजण चाचणीत हनुवाडी येथील 38 वर्षीय पुरुष,व रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आष्टी येथील 17 वर्षीय महिला,
14 वर्षीय महिला, 9 वर्षीय पुरुष, असे -3 हातडी येथील 23 वर्षीय महिला, 8 वर्षीय पुरुष, 37वर्षीय पुरुष, 15 वर्षीय पुरुष, असे -4 क-हाळा येथील 25 वर्षीय महिला,14 वर्षीय महिला ,40 वर्षीय पुरुष ,37 वर्षीय महिला ,13 वर्षीय महिला ,62 वर्षीय ,65 वर्षीय महिला, असे – 7 रुग्ण आहेत. असे एकूण पंधरा रुग्णांची भर शुक्रवारी परतूर तालुक्यात भर पडली आहे.

सर्वाना आंबा येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत सुरू असल्याची माहिती परतुर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद जाहेद यांनी न्यूज जालना प्रतिनिधीशी बोलताना दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक