Breaking News
परतूर तालुका

परतूर ,आष्टी,सेवलीत भाजपच्या वतीने “घंटानाद आंदोलन “

परतुरातही दार उघड उद्धवा दार उघड ची हाक
दीपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने बंद केलेले मंदिरे उघडण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश समन्वयक डॉ. स्वप्नील मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आज पारेश्वर संस्थान मंदिर हस्त खेडा येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वप्नील मंत्री व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात घंटानाद आंदोलन केले यामध्ये गावकऱ्यांनी उपस्थिती दाखवून शासनाचा विरोध करून महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्याची मागणीही केली या ठिकाणी स्वप्निल मंत्री यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व हस्त खेडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून भाजपा महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

आष्टीत भाजपच्या वतीने “घंटानाद आंदोलन “

आष्टी :- आज दिनांक 29 रोजी भाजपा युवा मोर्चा आयोजीत घंटानाद आंदोलन आष्टी येथील श्री खंडेश्वर मंदिर येथे आष्टी युवा मोर्चा भाजपाच्यावतीने करण्यात आले यावेळी या आंदोलनात सहभागी पंचायत समिती उपसभापती रामप्रसाद थोरात ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग गांजाळे, बालासाहेब फुलारी, मधुकर मोरे, आनंदा आगलावे, बळीराम थोरात ,दशरथ लुंगारे, माऊली थोरात आंदोलनात सहभागी झाले.

जालना तालुक्यातील सेवली येथे राज्यसरकारच्या विरोधात,हनुमान मंदिरासमोर भाजपा च्या वतीने म्हणत घंटानाद आंदोलन:

तुकाराम राठोड :(सेवली)कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंद असलेली सर्व मंदिरे भाविकांसाठी तात्काळ चालु करण्यात यावीत म्हणुन आज जालना तालुक्यातील सेवली येथे राज्यसरकारच्या विरोधात दार उघड उद्धवा दार उघड. म्हणत घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी जालना तालुका अध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वर शेजुळ यांनी राज्य सरकारवर सडकुन टिका केली व बंद असलेली सर्व मंदिरे भाविकांसाठी तात्काळ खुली करण्याची मागणी केली.यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.जिजाबाई जाधव,सेवलीचे माजी सरपंच श्री कोमलशेठ कुचेरिया,चेअरमन दिलीपराव जोशी,ग्रा.पं.सदस्य शिवराज तळेकर,वैजिनाथआप्पा तळेकर,अशोकशेठ साकला,अतुल सेवलीकर,महेश राजमुळे,तानाजी राऊत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक