जालना तालुका

नंदापूर शिवारात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याला सुरवात

जालना/तुकाराम राठोड दि २९

अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम नदापुर शिवारात सुरू झाले असून यामुळे शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त होत आहे.

नुकसानीच्या पार्श्‍वभुमीवर जालना तालुक्यातील नंदापूर येथील शिवारात शुक्रवार (ता.28) पासून शासनाच्या आदेशानुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये महसूलचे तलाठी सीमा फलके, ग्रामसेवक महेश वझरकर, कृषिसहायक विधाते हे शेतकर्‍यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी करत आहे. यामुळे शेतकर्‍यांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी खचून न जाता पंचनामे करण्यास प्रशासनास सहकार्य करावे. कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचीत राहणार नाही याचीही काळजी घेतल्या जाईल.असे तलाठी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक