जालना जिल्हा

जालना जिल्हा कोषाधिकारी कार्यालयातील डीव्हीआरची चोरी

न्यूज जालना ब्युरो दि २९

जिल्हा कोषाधिकारी कार्यालयात मध्यरात्रीच्या दरम्यान खिडकीचे गज कापून प्रवेश करुन चोरी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सुत्रांनी सांगीतले.चोरट्यांनी या कार्यालयात प्रवेश करुन एक सीसीटीव्ही कॅमेरे कनेक्ट असलेला डीव्हीआर, इंटरनेट ब्राॅड बॅंड व स्विच चोरी केले असल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगीतले.

येथील मुख्य अधिकाऱ्याची आठवडाभरापुर्वी बदली झालेली असुन कुणीतरी खोडसाळपणा करण्यासाठी असे केले असावे अशी शक्यता या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व्यक्त करीत आहेत.दरम्यान, घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या पथकासह तालुका जालना पोलीसांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक