Breaking News
भोकरदन तालुका

एकेफळ गावात भर पावसाळ्यात सुद्धा भीषण पाणी टंचाई

  मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तालुक्यातील एकेफळ गावात भर पावसाळ्यात पाणी टंचाई  असुन मागील एक महिन्यापासून गावातील पाणीपुरवठा नळाला पाणी आलेले नाही एकेफळ ग्रामपंचायत अंतर्गत पळसखेडा येथील धरणातअसलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो पन आता मात्र एक महिना झाला गावात भीषण पाणी टंचाई चालू आहे गावातील लहान मुलं ,महिलांना दूरवरून पायी जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते ,यावर्षी कोरोना आजाराचा कहर चालू असताना कोणत्याही विहिरीचे पाणी गावकरऱ्यांना पिण्यासाठी आणावे लागते परिणामी आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही
ग्राम पंचायत ला वारंवार विनंती करून देखील ग्रामपंचायत झोपेचे सोंग घेऊन गप्प आहे.

हीच समस्या लक्ष्यात घेता गावातील सामाजिक कार्यकर्ते बळीराम नावळे ,आणि मनोज नावळे यांनी गावकऱ्यांना त्यांच्या विहिरीतिल मोटार चालू करून गावकऱ्यांना मंदिराजवळ पाणी चालू करून गावकऱ्यांच्या टाक्या स्वतः भरून दिल्या त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे महिला तसेच लहान मुलांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया : ग्रामपंचायत ला त्यांच्या कर्तव्याची जाणीव नाही  ग्रामपंचायत ही  गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी असते पण येथे मात्र उलटेच आहे शक्य होईल तेव्हढ्या दिवस मी स्वतः पाण्याच्या टाक्या भरून देण्याचे काम करेल
ग्राम पंचायत ने वेळ न लावता लवकरात लावकर पाणी पुरवठा सुरळीत करावा.
बळीराम नावळे -सामाजिक कार्यकर्ते

प्रतिक्रिया : सरपंच ,आणि ग्रामसेवक यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत केलेला नाही  मागच्या उन्हाळ्यात अश्या च प्रकारे ग्राम पंचायत ने पाणीपुरवठा सुरळीत केला नव्हता तेव्हा मी स्वखर्चाने गावात मोफत पाण्याचे टँकर चालू करून पाणी वाटप केले होते आता तर पाऊस खूप आहे , ग्राम पंचायत ने लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा.

उपसरपंच  :-  ज्ञानेश्वर नावळे एकेफळ ग्रामपंचायत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक