Breaking News
कोरोना पॉझिटिव्ह बातमीघनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात एकाच दिवशी ह्या सहा गावात 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.

घनसावंगी /नितिन तौर दि ३० घनसावंगी तालुक्यातील सहा गावातील शनिवारी रात्री दहा संशयीत रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे तालुक्यातील पानेवाडी 2,राणी उचेगाव २,खालापूरी 1,पिंपरखेड 2,घनसावंगी 2 ,पाडुळी 1, तर यात घनसावंगी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचारी सुद्धा पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यात पानेवाडी येथील एका 39 वर्षीय महिला व 19 वर्षाच्या युवक,खालापुरीतील 60 वर्षीय महिला,पाडूळीतील 11 वर्षाचा मुलगा,राणी ऊंचेगावातिल एक 45 वर्ष महिला व 60 वर्ष पुरुष,पिंपरखेड येथिल 37 वर्ष व्यक्ती चा व 20 वर्षीय तरूणाचा व घनसावंगी येथील एक 30 व दुसरा 39 वर्षीय व्यक्तीचा समावेश असल्याची माहीती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. उपाययोजना सुरू आरोग्यविभाग – ह्या सहा गावात उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून हाय रिस्क यादी तयार करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक