Breaking News
जालना जिल्हा

अभाविप जालना शाखेच्या वतीने त्या घटनेबाबत कारवाई करण्याची केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्याकडे मागणी

जालना न्यूज ब्युरो दि ३० अभाविप च्या विद्यार्थ्यांना धुळे येथे झालेली हाणामारीच्या निषेधार्थ जालना शाखेच्या वतीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे याना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यात पोलिसांनी निर्दयी पणे लाठीमार व बुक्यांचा मारा विद्यार्थ्यांवर केला. त्यावेळी आलिशान कार मध्ये बसून बघ्याची भूमिका घेणाऱ्या राज्यमंत्री आ अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे वचन देऊन नापास करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी अभाविप निवेदनात केली आहे. यावेळी अनिकेत शेळके, वेदांत खैरे, प्रथमेश कुलकर्णी,समाधान कुबेर आविष्कार इंगळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक