जालना जिल्हा

नंदापूर येथील तीन किलोमीटर खराब झालेला रस्ता दुरूस्तीची आ. गोरट्याल यांच्याकडे मागणी


आ. गोरंट्याल यांच्यासह मुख्यमंत्र्याकडे केली निवेदनाव्दारे मागणी

जालना/तुकाराम राठोड दि ३ सप्टेंबर

रस्त्यांना विकासाच्या नाड्या म्हणून ओळखले जाते. दळणवळणाचा मुख्य स्त्रोत म्हणून विकासाकडे पाहीले जाते. असे असले तरी ग्रामीण भागातील बहुतांश भागात रस्ते असून अनेक वर्षापासून त्यांची मलमपट्टी न केल्याने अनेक समस्यांना ग्रामीण भागातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.


जालना तालुक्यातील नंदापूर येथील नंदापूर ते नंदापूर फाटा या तीन किलोमीटर रत्यांची अनेक वर्षापासून मलमपट्टी न केल्याने दुरवस्था झाली असून या रस्त्यात जागोजागी मोठ्याले खड्डे पडले असून शेतकर्यांसह वाहन धारकांना या रस्त्यावरून आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्ता दुरूस्ती करण्यासाठी अनेकदा संबंधित अधिकारी यांच्याकडे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने
या तीन किलोमीटर रस्ता दुरूस्ती करण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे एका निवेदनाव्दारे रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी मागणी केली आहे.


नंदापूर येथील सुदर्शन राजाभाऊ उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यातील द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेले नंदापूर हे गाव मुबंई-नागपूर हायवेपासून अगदी तीन किलोमीटर तर जालना शहरापासून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावर आहे. या गावची लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास असल्याने येथील नागरिकांची जालना येथे मोठ्या प्रमाणात येजा करीत आहे. या गावात द्राक्षांसह, डाळींब, सिताफळ या पिकांसह ज्वारी, बाजरी, मुग, कपाशी, सोयाबीन हे पिके मोठ्या प्रमाणात घेतले जातात.

नंदापुरसह कडवंची-वाडी येथील नागरीकांची रेलचेल याच रस्त्याने होत असून या तीन किलोमीटर रस्त्याचे अंतर कापण्यासठी तब्बल अर्धा तासांचा कालावधी लागत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अनेकांना पाठ दुखी, मनका दुखीचा त्रास जाणवत आहे. रस्ता दुरूस्तीसाठी गावकर्‍यांच्यावतीने अनेकदा जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे गावकर्‍यांमधुन संताप व्यक्त करण्यात आहे. नंदापूरसह, वाडी (कडवंची) येथील नागरिकांना जालना बाजारपेठ जवळ असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी जालना येथे जावे लागत आहे. मात्र या रस्त्यावर खड्यात रस्ता कि, रस्त्यात खड्डे अशी अवस्था झाल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहे. नंदापूर येथील तीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करून जवळपास 15 वर्षाच्या वर कालावधी झाला आहे. नंदापूर येथे दालमिल कंपनी व माळावर तोट्याची कंपनी असल्याने या रस्त्यावर जड वाहनांची वाहतुक मोठ्या प्रमाणात होते. अगोदरच खड्डे पडलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने जात असल्याने या रस्त्यावर मोठाले खड्डे पडत असून याचा नाहक त्रास नंदापूरकरांना सहन करावा लागत आहे. अनेकदा प्रवास करतांना खड्यामुळे अपघातही होत आहे. याकडे मा. मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष देऊन संबधित विभागास रस्ता दुरूस्तीसाठी आदेशीत करावेत.

अशी मागणी, नंदापूर येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या निवेदनावर सुदर्शन उबाळे, दशरथ वाकोडे, राहूल खरात, भीमराज खरात, संदीप खरात आदींच्या स्वाक्षर्या आहे. सदरील निवेदनाच्या प्रती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, मख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जालना यांना देेेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक