अंबड तालुका

परिसर व रस्ता साफसफाई करून साजरा केला गणेशोत्सव

अनिल भालेकर/अंबड

गेल्या पाच महिन्यापासून कोरोना संकाटा मुळे शाळा बंद आहेत. अनेक शाळा ऑनलाइन शिक्षण पद्धती राबवत असल्या तरी त्यालाही खूप मर्यादा आहेत. कोरोना संकटामुळे सर्व सण उत्सव साधेपणाने साजरी करावे लागत आहेत. लहान मुलांनी आवडता असणारा गणेशोत्सवही यावर्षी सार्वजनिकरित्या साजरा करता येणे होऊ शकले नाही.

गणेश उत्सवा निमित्त अनेक गणेश मंडळे विविध स्पर्धाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे बालगोपाळांना या उत्सवाची खूप आतुरता असायची. बाप्पाची सार्वजनिकरित्या प्रतिष्ठापना केली नसली तरी, या काळातील आनंद घेण्याच्या व विधायक कार्य करण्याबरोबरच विद्यार्थ्यांनाही परिसर स्वच्छता बाबत आपले कर्तव्य म्हणून जाणीव होण्याच्या दृष्टीने सामाजिक कार्यकर्ते संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड शहरातील नवरत्न गणेश मंडळाच्या बालगोपालांनी वसाहतीच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवून परीसर चकाचक केला.

नवरत्न गणेश मंडळ दरवर्षी गणेशोत्सव च्या काळामध्ये अनेक विधायक कार्य करत असते. यावर्षी मात्र सार्वजनिक रित्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली नसली तरी विधायक कार्य करण्याची गणेश मंडळाची परंपरा बालगोपालांनी जपण्याचा प्रयत्न केला.उत्साहात आनंदात बालगोपालांनी स्वच्छता मोहीम राबून परिसर स्वच्छ केल्याचे पाहून वसाहतीतील रहिवाशांनीही त्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक