Breaking News
घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावात सार्वजनिक स्वछता ठेवण्याची व्यापारी महासंघाची ग्रामपंचायतला मागणी

अस्वच्छते बाबत व्यापारी महासंघाच्या वतीने सरपंच उपसरपंच यांना निवेदन

कुंभार पिंपळगाव /संभाजी कांबळे दि ३१

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावात व्यापारी बांधवांसाठी मुतारी ,शौचालय उभारण्यात यावे ,पथदिवे सुरू करण्याची मागणी व्यापारी महासंघाने ग्राम पंचायत ला दिलेल्या निवेदनात केली आहे

कुंभार पिंपळगाव हे मोठे बाजार पेठेचे गाव असुन या गावाला आस पास 30ते 40 खेडेगावचा संपर्क या कुंभार पिंपळगावाला आहे

बाजार पेठेतील समस्या विळख्यात कुंभार पिंपळगाव हे मोठे बाजार पेठेचे गाव असुन येथील बाजार पेठेतील समस्यात दिवसे दिवस वाढ होत आहे बाजार पेठेतील रस्त्यावर गटार नाल्या प्रचंड तुबलेल्या जागोजागी कचरा घाणीचे साम्राज्य असलेने याकडे ग्रामपंचायत कार्यलयाचे दुर्लक्ष दिसुन येत आहे

त्या घाणीमुळे डासांचे प्रमाणात वाढ झाली आहे व्यापारी व ग्राहक ग्रामस्थांना अनेक आजार होण्याची शक्यता आहे यासाठी घंटागाडी व कायमस्वरूपी सफाई कामगार नियुक्त करणे आवश्यक आहे तसेच बाजार पेठ परिसरात कुठे ही पथदिवे नाहीत ते तत्काळ सुरु करण्यात यावे

अशी मागणी करण्यात आली आहे .ह्या निवेदनात शंभर ते दोनशे व्यापारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक