घनसावंगी तालुका

भारतीय जनता पार्टीच्या वतीने घनसावंगी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

घनसावंगी / नितीन तौर दि ३१

घनसावंगी भारतीय जनता पार्टीचे च्या वतीने सोमवारी दुपारी (ता ३१) तालुक्यातील मंदिर,मज्जित,चर्च, गुरुद्वार इत्यादी धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी तहसील कार्यालयावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी ह.भ.प.रमेश महाराज वाघ,भाजपा अ.जा. प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव,भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे,भाजपा किसान मोर्चा ता.अध्यक्ष कैलासराव शेळके,गोविंद ढेंबरे,तुकाराम महाराज राठोड,भास्कर महाराज हरबक,अंबादास महाराज शेळके,योगेश ढोणे,सुरेश पोटे,सुरेश उगले याची उपस्थिती होती

भारतीय जनता पार्टी व वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने घनसावंगी येथे तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील सर्व मंदिरे खुले करण्यासाठी केंद्र शासनाने आदेश दिले असतानाही महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे कोरोना मुळे गेली सहा महिन्यापासून मंदिर बंद आहेत मंदिर बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो लोकांचे जीवन या मंदिरावर चालतात गेली सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे त्या लाखो लोकांचा जीवन उद्धाराचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात दारूचे दुकान उघडते तर मंदिर उघडायला काय हरकती शासनाने दिलेल्या नियमात मंदिर तात्काळ उघडावे या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी व वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने घनसावंगी येथे तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले यावेळी नायब तहसीलदार उन्हाळे व मंडळ अधिकारी घनवट यांना निवेदन देण्यात आले

ह्या प्रसंगी अर्जुन माळोदे,एकनाथ राठोड,सिद्धेश्वर भाणूसे,किशोर गिराम,राहुल काळे,बप्पा देवडे,अर्जुन थेटे,जगन्नाथ मुळे,रमेश काळे,बाळासाहेब बहिर,विलास चव्हाण,मधु गुढेकर,विश्वास घुले,शिवाजी राठोड,कांतराव वराडे,राम भालेकर,राजु वाघमारे,रघुनाथ इंचाळ,संदीप काळे,अनिल तौर,सुनील शेंडगे,गजानन काकडे,ज्ञानेश्वर सानप,सुनील गुढेकर,हरिदास पवार,हरिभाऊ तांगडे,भगवान काकडे,सुहास साबळे व संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक