जालना तालुका

बाजीउम्रद येथे कपाशीची झाडे उपटून फेकल्याप्रकरणी एक जनावर गुन्हा दाखल

बबनराव वाघ,उपसंपादक : जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथील सुखदेव नागोराव सवडे यांच्या शेतातील 14 ते 15 गुंठे कपाशीची ची झाडे शेजारच्या शेतकऱ्यांनी उपटुन फेकल्याची घटना शुक्रवार ता( २८ ऑगस्ट) घडली. आहे याबाबत मौजपुरी पोलीस ठाण्यात संबधीताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सविस्तर वृत्त असे की ,बाजीउम्रद येथील सुखदेव नागोराव सवडे यांची गट क्रं 309 मध्ये तिन एकर शेती आहे.याच शेतात तिन एकर कपाशीची लागवड करण्यात आली आहे.सवडे शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजेदरम्याण शेतातील काम अटोपुन घराकडे निघुन गेले व जेवन वगैरे अटोपुन 9 वाजता शेतात असलेल्या गायीला वैरण टाकण्यासाठी परत आले तर शेतातील 14 ते 15 गुंठे कपाशीची झाडे उपटल्याचे दिसुन आले.

चौकशी केली असता शेजारी बाबासाहेब काशीनाथ लिंबाळकर हे शेतात येवुन गेल्याचे कळाले, बाबासाहेब लिंबाळकर याने यापुर्वी दोन वेळा असे लगातार तिस-यांदा शेतातील कपाशीचे नुकसान केल्याचे यांच्या लक्षात आले. दि 29 रोजी मौजपुरी पोलीस ठाण्यात बाबासाहेब विरुध्द तक्रार अर्ज दिला.मौजपुरी पोलीस ठाण्याचे बिट अमलदार यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला व रविवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता बाबासाहेब लिंबाळकर यांचे विरुध्द संशयावरुन नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक