बदनापूर तालुका

बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे


बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ दि ३१
बदनापूर तालुक्यातह सागरवाडी येथे काही दिवसापूर्वी पाऊसाची झडी चालू होती. त्या पाऊसाने मुंग. तूर. कपास. मक्का अशा अनेक पिकाचे नुकसान झाले आहे. पिकाला केलेला खर्च फिटले नाही म्हणून सागरवाडी येथील कारभारी बहुरे यांनी उंभ्या मूंग मध्ये ट्रॅक्टर ने रोटा फिरवला आहे व सर्व पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

आपली व आपल्या परिवाराची पोटाची उपजीविका कशी भागवायची हा प्रश्न शेतकरी ना पडला आहे. या नुकसानी चे शासनाने पंचनामा करावा अशी मागणी सर्व शेतकरी करीत होते. त्या पार्शवभूमीवर तलाठी काकडे. ग्रामसेवक श्रीमती. आष्टीकर. कृषी सहायक. झुंजारे यांनी पिकांचे पंचनामे केले.. या वेळी सागरवाडी चे सरपंच. देवचंद बहुरे. उप सरपंच डॉ. केसरसिंग बहूरे. माझी सरपंच अंबरसिंग बहुरे. सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल. शामसिंग बहूरे. मंगल जारवाल. कीसान करणी सेना अध्यक्ष अरुण खोकड. अजितसिंग खोकड हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक