बदनापूर तालुका

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी- आमदार नारायण कुचे

पालकमंत्री राजेश टोपे यांना पत्र देऊन केली मागणी- आमदार कुचे

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ दि ३१
बदनापूर ता.31 बदनापूर तालुक्यात आतिउष्टी झाल्याने आमदार नारायण कुचे यांनी पालकमंत्री राजेश टोपे याना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ नुकसान भरपाई मिळावी याकरिता निवेदन देण्यात आले, या निवेदनाद्वारे असे म्हटले आहे कि, मराठवाड्यासह महारष्ट्रात अगोदरच शेतकरी बियाणे कंपनी आणि महाराष्ट्र सरकार कडून बोगस बियाणे देण्यात आल्यामुळे परिणामी शेतकऱ्याना एकदा नाहीतर, दोनदा शेतकऱ्याने बी-बियाणे उधारी आणि उसनवारीने घेऊन पेरणी केली आहे, असे असताना खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे, मागील आठवड्यात चालू असलेल्या संततधार पावसामुळे मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील कापूस, मुग,उडीद, सोयाबीन, मका,व मिर्ची यासारखी पिके नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे,

यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. जालना जिल्ह्यात बदनापूर, भोकरदन, अंबड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस या उत्पनावर परिणाम दिसून येणार आहे, त्याचबरोबर मुग,उडीद,मका, कापूस,सोयाबीन,मिरची हे पिके पाण्यामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहे तर मुग, उडीद या पिकाच्या शेंगा पूर्णपणे सडून गेल्या असून काही मुगाच्या शेंगाना जागीच कोंब फुटू लागल्यामुळे हा मुग पुर्णपणे वाया गेला आहे, कपाशीच्या शेतात पाणी साचल्यामुळे कपाशीच्या पाते कैऱ्या गळून पडल्या आहे, या संततधार पडणाऱ्या पावसामुळे फळ बागायतीही धोक्यात आली आहे. पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांची पाने पिवळी पडली आहे या सततच्या झिम झिम पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतीकामे बंद असून आता पिके वाचवायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांना तात्काळ मदत घ्यावी अशी मागणी आ नारायण कुचे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक