परतूर तालुका

व्यापारी संकुलन व परिसरातील अतिक्रमणे न काढल्यास आंदोलनाचा व्यापाऱ्याचा इशारा !


आष्टी प्रतिनिधी दि ३१ :- आष्टी ता परतूर येथील महात्मा फुले व्यापारी संकुलन ,बसस्थानक व माजलगाव रोड परिसरातील व्यापारी यांनी आज दिनांक 31 रोजी आष्टी ग्रामपंचायत व आष्टी पोलीस ठाण्यास परिसरातील अतिक्रमना संदर्भात निवेदन देवून हे अतिक्रमणे तात्काळ काढण्या बाबत निवेदन दिले असुन सदरील अतिक्रमणे न काढल्यास व्यापारपेठ बंद ठेवून ठिय्या आंदोलनचा इशारा देण्यात आला असुन या दिलेल्या निवेदनात असे म्हण्टले आहे की गेल्या अनेक वर्षापासुन व्यापार करीत असुन आमच्या दुकानासमोर व संकुलानासमोर गेल्या दोन वर्षा पासुन दिवसे दिवस अतिक्रमणात वाढ होत असुन या अतिक्रणामुळे दुकानावर येण्यास ग्राहकास व व्यापाऱ्यास त्याच बरोबर रहदारीस देखील अडथळा निर्माण होत असुन या अतिक्रणा बाबत सर्व व्यापाऱ्यांनी होणाऱ्या अडचणी बाबत ग्रामपंचायत व पोलीस ठाणे यास दिनांक 16/02/2018 रोजी व्यापाऱ्यांनी निवेदन दिले होते

व यांचा पाठपुरावा तोंडी , भेटून निवेदनाद्वारे अनेक वेळा केला मात्र ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने या बाबत दखल घेतली नाही. दरम्यान गेल्या आठवड्यात या अनाधिकृत अतिक्रमण धारक व व्यापारी संकुल मधील व्यापारीत वाद होवून हाणामारी चा प्रकार देखील घडला होता या वेळी सर्व व्यापारी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक हे सर्व मिळुन पोलीस ठाण्यात गेले होते त्या वेळी लवकरच अतिक्रमण काढण्यात येईल असे सांगण्यात आले या अतिक्रमण धारकांचे व व्यापाऱ्यांचे नेहमी वाद होत होवून शाब्दीक चकमक ,शिवीगाळ ,भांडण होत असुन अशा घटना अनेक वेळा घडल्या असुन या मुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने या संकुलनासमोर,बसस्थानासमोर ,माजलगाव रोड वरील अतिक्रमणे दिनांक 02/09/2020 रोजी पर्यंत अतिक्रमणे न काढल्यास व्यापार पेठ बंद करून व्यापरी संकुलनासमोर जोपर्यंत अतिक्रमणे हटवण्यात येत नाहीत तो पर्यंत लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येईल.असा इशारा आष्टी ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यास दिलेल्या निवेदनात म्हण्टले असुन या निवेदनावर पन्नास च्या वर व्यापार्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक