जालना जिल्हा

तगडा पोलीस बंदोबस्तात जालनातील मोती तलावात गणेश विसर्जन

न्यूज जालना ब्युरो / दि १

जालना शहरातील मोती तलावात मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये गणेशमुर्ती विसर्जनास सुरुवात झाली असुन जालना नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन करण्यात येत आहे.

गत दोन वर्षापुर्वी याच तलावात गणेशविसर्जनादरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता त्या पार्श्वभूमिवर खबरदारी घेत या वर्षी नियोजनबद्ध गणेशविसर्जन सुरु आहे. ३० लोडींगद्वारे शहरातील गणेशमूर्ती संकलित करुन ६ तराफे व १ स्पीड बोटद्वारे या तलावात ४० तरबेज पोहणाऱ्या तरुणांच्या सहाय्याने गणेश विसर्जन केले जात आहे.

नांदेड येथील विशेष पथकाद्वारे नागरिकांकडून संकलित केलेल्या गणेशमुर्तींचे तराफ्याद्वारे मोती तलावात विसर्जन करण्यात येत आहे.नगर पालिका प्रशासनाच्या गाड्यांद्वारे शहरातील गणेशमूर्ती संकलन सुरु असुन या ठिकाणी पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक