परतूर तालुका

परतुरमध्ये तलावातील दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !


दीपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क दि १
परतूर शहरातील आंबेडकरनगर परिसरात असणाऱ्या तलावातील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याकडे परतूर नगरपरिषदने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे

आंबेडकरनगर परिसरात एक जुना पाण्याचा तलाव आहे.परंतु या तलावातील पाणी खराब झाल्याने परिसरातील आंबेडकरनगर,गोंधळी गल्ली,मुजमुले गल्ली,पंजीतन गल्ली या भागात ह्या पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.या दुर्गंधीमुळे नागरिकांना घरात बसणे देखील दुरापास्त झाले आहे.या भागात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तलावाची पाहणी करून घाण पाण्याची विलेवाट लावण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते द.या.काटे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अर्जुन पाडेवार तसेच सुधाकर पाडेवार समाधान पाडेवार यांच्यासह अनेक ग्रामस्थच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक