Breaking News
अंबड तालुका

अंबडमध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन

अंबड / अनिल भालेकर दि १ सप्टेंबर पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन अंबड येथील ओमशांती काँलनी येथील शिक्षक श्रीधर यशवंतराव कुलकर्णी यांच्या घरी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन करण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे अथवा नगरपालिकेच्या पथकाकडे ‘श्री’ ची मूर्ती द्यावी या न.प.च्या आवाहनाला सर्व कुटुंबियांनी प्रतिसाद दिला. सौ.शोभा कुलकर्णी यांनी घरीच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार केली होती.श्री बबनराव कुलकर्णी यांनी श्री गणेशाची विधिवत पुजा व आरती केली. या प्रसंगी कुटुंबातील सर्व सदस्य बालमंडळी उपस्थित होते. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन श्रीधर कुलकर्णी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक