घनसावंगी तालुका

पिंपरखेड बु मध्ये एकाच दिवशी १२ जण पॉझिटिव्ह

गावासह परिसरात खळबळ :१२५ जणांच्या अँटीजन तपासणीत १२ जण पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनिधी दि १ सप्टेंबर

घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या अँटीजन चाचणी कॅम्प मध्ये एकूण १२५ जणांच्या चाचणीत १२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे यात चार महिला व आठ पुरुषांचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ दीपाली चव्हाण यांनी सांगितले दरम्यान एकाच दिवशी गावात १२ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


पिंपरखेड बु येथे आठवयात सर्वप्रथम एक दांम्पत्य पॉझिटिव्ह आढळून आले होते.त्यानंतर परत दोन व घनसावंगी येथें झालेल्या चाचणीत दोन, सोमवारी एक तर मंगळवारी झालेल्या कॅम्प मध्ये १२ असे एकूण १९ जण पिपरखेड येथे कोरोना बाधित आढळून आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक