Breaking News
जालना जिल्हा

गणेश विसर्जन करतांना शेततळ्यात पडून जालन्यातील दोन युवकांचा मृत्यू


रोहनवाडी शिवारात घडली दुर्घटना

न्यूज जालना ब्युरो दि १

जालना येथील काद्राबाद झेंडा परिसरातील तीन मित्र मोटारसायकलवरून गणेश विसर्जनासाठी रोहनवाडी शिवारातील शेतात गेले होते.

शेततळ्यात गणेश विसर्जन करीत असताना तिघेजण पाय घसरून आतमध्ये पडले.त्यामध्ये सौरभ देवेंद्र जैस्वाल (17), सिद्धार्थ रवींद्र वाघमारे (18) हे दोघेजण बुडून मरण पावले.त्यांच्यासोबत असलेला एक तरुण पोहता येत असल्याने बचावला. हे शेत वाघमारे यांचे असल्याचे समजते. ही घटना 5.30 वाजता घडली.तालुका जालना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आणखी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

बदनापूर तालुक्यातील आनवी राळा येथील कैलास राठोड (35) या शेतकऱ्याचा तळ्यात बुडून आज दुपारी मृत्यू झाला. कापसावर औषधी फवारणी करण्यासाठी पाणी नेत असताना त्यांचा पाय घसरून ते पडले होते.
तर साळेगाव (ता. जालना) येथील समीर शेरखान (18)याचाही शेततळ्यात पडून आज दुपारी मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक