जालना जिल्हा

एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत सहाव्या आठवड्यामध्ये कोव्हीड योद्धयांना गौरव

न्यूज जालना दि. 1:– कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोव्हीड रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सेवक व सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत सहाव्या आठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोव्हीड योद्धयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते  रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. आज रोजीची बक्षिसाची रक्कम निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.  यावेळी  उपजिल्हाधिकारी(रोहयो)  रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी भुसंपादन गणेश नि-हाळे,  डॉ. संतोष कडले, उपस्थित होते.

            यामध्ये उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया पवार यांना चार हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ट  स्टाफ नर्स श्रीमती अर्चना हस्तक यांना तीन हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र,  उत्कृष्ट परिचर सुरज ढिलपे यांना एक हजार पाचशे रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र तर उत्कृष्ट परिचारीका श्रीमती उजमा पठाण यांना एक हजार पाचशे रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

    पहिल्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी स्वत: दिली होती तर दुसऱ्या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम डॉ. संजय जगताप, तिस-या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी दिली, चौथ्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , पाचव्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर यांनी दिली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक