घनसावंगी तालुका

टाळमृदुंगाच्या गजरात भक्तिभावाने बाप्पांना निरोप

घनसावंगी प्रतिनिधी दि २

भक्तिमय वातावरणात दिला निरोप
सिंदखेड (ता.घनसावंगी)- येथील नवतरुण गणेश मंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
गणपती विसर्जनाच्या दिवशी महाआरती करून महाप्रसादाचे वाटप केले आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीच्या अग्रभागी वारकरी भजनी मंडळ व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या मिरवणुकीत भक्तानी नाच गाणे फुगडी खेळुन मनसोक्त आनंद लुटला.या मिरवणुकीत गुलाल उधळत डीजे बँडला फाटा देऊन प्रदूषण टाळण्यासाठी ही मिरवणूक काढली होती. यावेळी मंडळाचे ज्ञानेश्वर आधुडे आकाश गाढे आकाश मोरे गणेश भागवत अभिषेक आधुडे अरुण आधुडे राहुल मोरे उपसरपंच अमोल आधुडे किशोर मोरे आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक