Breaking News
घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावात कोरोनामुक्त गाव अभियानास उस्फुर्त प्रतिसाद

कुंभार पिंपळगाव न्यूज नेटवर्क दि २

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे बुधवारी सकाळी मारोती मंदिर भागात कोरोनापासून वाचण्यासाठी कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यात आले यावेळी तहसीलदार नरेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती

कोव्हिड – 19 कोरोना मुक्त गाव अभियान करिता सात दिवसांकरिता घरगुती उपाय म्हणून दिवसभर गरम पाणी, तीन वेळा गरम लिंबू पाणी, मोसंबी आणि रात्री वाफ घेऊन झोपताना शुद्ध तुपाचे एक थेंब प्रत्येक नाकपुड्यात टाकून झोपणे या बाबतीत अंगणवाडी कार्यकर्ती, शिक्षक, आशा मदतनीस, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकारांना तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत कुंभार पिंपळगाव च्या ग्रामपंचायत समोर मंदिर परिसरात प्रशिक्षण देण्यात आले.


सूत्रसंचालनात डॉ अमित देशमुख यांनी योगिक शुद्धिक्रियांची माहिती करून दिली. देवानंद चित्राल यांनी वमन आणि जलनेती चे प्रात्यक्षिक करून दाखवले. तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी सकस आहार तसेच दिवसभर गरम पाणी पिणे, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गरम लिंबू पाणी, एक मोसंबी व रात्री वाफ घेण्यासाठी आवाहन केले.

ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या सर्व कर्मचार्यांनी घरोघरी हा संदेश देऊन नागरिकांना दररोज आठवण करून देणे बाबतीत मार्गदर्शन केले. देवानंद चित्राल यांनी रोगाचे कारण विषाणू नसून शरिरात साचलेल्या मला मुळेच रोग होतो म्हणून हा मल काढण्यासाठी योगिक शुद्धिक्रियांची सविस्तर माहिती दिली.

या करिता स्वामी विवेकानंद शाळेतील शिक्षक व श्रीमती किर्ती उढाण यांनी साहित्य उपलब्ध करून दिली, आरोग्य सेवक श्री एकनाथ पोपळघट,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, ग्रामसेवक, मंदिर समितीने सहकार्य केल्याबद्दल देवा चित्राल यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक