घनसावंगी तालुका

परतूर येथील शास्त्री विद्यालयात सेवा गौरव समारंभ


दिपक हिवाळे परतूर न्यूज नेटवर्क दि २
येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात सोमवारी सेवा निवृत्ती निमित्त शिक्षकांच्या सेवागौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कपिलभैया आकात हे होते तर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक विजय राखे,राज काकडे,मुख्याध्यापक दत्तात्रय खिल्लारे हे होते.
शाळेचे शिक्षक शरद पाटील,नागोराव आखाडे व नाईक माणिकराव काळे हे सेवानिव्रुत्त झाल्याने शाळेच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.


यावेळी आकात यांनी पाटील,आखाडे व काळे यांचे उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल कौतुक केले.अशाच प्रकारचे कार्य सर्वांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्याध्यापक खिल्लारे यांनीही तिघांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
यावेळी आकात यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी आकात,राखे,उपमुख्याध्यापक एस.के.वायाळ, पर्यवेक्षक सुभाषराव खुरपे ईतरांची भाषणे झाली.निवृत्त शिक्षक पाटील,आखाडे यांनी सत्काराला उत्तर देताना शाळा आणि संस्थेने दिलेल्या चांगल्या वागणूकीबाबत क्रुतज्ञता व्यक्त केली.


कार्यक्रमाला श्रीमती शुभांगी पाटील,महानंदा आखाडे,सुदामती काळे, शिवानी वाघमारे,कौस्तुभ वाघमारे यांच्यासह विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक सोपानराव केकते,अम्रुतराव सवने,गणपतराव शिंदे,दत्तात्रय आकात, सुधाकरराव वानखडे,हरिओम कोरके,शिवाजीराव कामठे,दिनकरराव टकले,संजय कदम,निव्रुत्तीराव कातारे,भास्करराव सोळंके,सहशिक्षिका चंदा लड्डा,सविता अवसरमोल ईतरांची उपस्थिती होती.
सहशिक्षिका अलका सहस्त्रबुद्धे यांनी सुत्रसंचलन केले तर खुरपे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक