जालना जिल्हामराठवाडा

थॅन्क्स अ टिचर’ अभिनयात शिक्षक, विद्यार्थी,नागरिक यांनी सहभागी व्हावे

अनिल भालेकर / जालना न्यूज दि २

समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला नवीन वळण देण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी शासनाच्या परिपत्रकानुसार ‘थॅन्क्स अ टिचर’ अभियानात अंबड तालुक्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी,नागरिक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अंबड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विपुल भागवत तथा डायट जालना येथील अधिव्याख्याता व अंबड संपर्क अधिकारी विनोद राख यांनी संयुक्तपणे केले आहे.

या अभियानात शाळा बंद शिक्षण सुरु या उपक्रम यशोगाथाचे सादरीकरण केले जाईल यात कोविड १९ काळात शाळा बंद असल्या तरी विविध माध्यमातून व उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवणाऱ्या शिक्षकांच्या यशोगाथाचे केंद्र व तालुकास्तरावराचा समावेश असेल.कोविड १९ काळात शिक्षणावर परिसंवाद, शिक्षक दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी वक्तत्व, निबंध, घोषवाक्य,कविता, प्रेरणा, प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धांचे ओनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात येईल.

कोविड १९ काळात शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी शिक्षण देण्या व्यतिरीक्त कोविड योद्ध म्हणून जबाबदारी पार पाडली अशा शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येईल. तसेच शैक्षणिक रांगोळी,चित्रकला,सुशोभन स्पर्धा, शिक्षणाच्या प्रयोगशील शाळांचे सादरीकरण,शिक्षक असलेले पण आता उच्च पदावरील व्यक्तींच्या मुलाखती घेणे याचाही या अभियानात समावेश केलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक