Breaking News
परतूर तालुका

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पत्नी व सात वर्षीय मुलीची हत्या

आष्टी प्रतिनिधी/ २ सप्टेंबर

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह एका चिमुकलीची हत्या केल्याची दुर्दैवी घटना परतुर तालुक्यातील अकोली येथे घडली आहे.

परतूर तालुक्यातील अकोली या गावी पतीने आपल्या पत्नीचा आणि सात वर्षाच्या मुलीचा खून केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ज्योती शहाजी देशमुख (वय 28) आणि ऋतुजा शहाजी देशमुख (वय 7), असे या दुर्दैवी मायलेकीचे नावे आहे.

दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच जालन्याहून ही पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. प्रकरणी आरोपी शहाजी देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया आष्टी पोलीस ठाण्यात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक