जालना जिल्हा

जालन्यात चाकुचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटले

जालना/ प्रतिनिधी दि २
देवमुर्ती येथे चहा घेतल्यानंतर दुचाकीहून जालन्याकडे येत असतांना पाठीमागून विना नंबरच्या पल्सर दुचाकीहून आलेल्या तीन जणांनी आडवून चाकु खुपसण्याची धमकी देऊन रोख रक्कम लुटून लॅपटॉपचे नुकसान करुन दुचाकी पळविल्याची घटना जालना शहरातील सिंदखेड राजा चौफुलीजवळील एसआरपीएफच्या टाकीजवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.


कैलास लक्ष्मण भोकरे (३६, वखारी वडगाव) असे लुटलेल्या व्यक्तीचे नाव आहे.कैलास भोकरे यांना मुंबईला जायचे असल्यामुळे जालन्यापर्यंत ते वखारी वडगाव येथून दुचाकीने निघाले होते. दरम्यान, देवमुर्ती येथे चहा घेतला. यानंतर निघाल्यानंतर एसआरपीएफच्या टाकीजवळ आले असता, त्यांच्याच पाठीमागून एक लालसर रंगाची विना क्रमांकाची पल्सर आली. तीन जणांनी ही पल्सर दुचाकीला आडवी लावली.

यानंतर तीन जणांनी समोरुन येऊन तुझ्याजवळ काय आहे ते लवकर दे, नसता पोटात चाकु खुपसतो, अशी धमकी देऊन खिशातील २५ हजार रुपये, मोबाईल, दुचाकी असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी भोकरे यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक