संपादकीय

होळी साजरी करा पण जरा अनोख्या/वेगळ्या पध्दतीने…

लेखक - डॉ संतोष पाटील जालना

images (60)
images (60)

आपण आपल्या संस्कृतीमध्ये होळी हा सण खूप आनंदाने साजरा करत असतो . होळी व त्याबरोबर धूलिवंदन ही जणू आपल्यासाठी आनंदाची पर्वणीच असते . असे म्हटले जाते की होळी पेटविली म्हणजे त्या होळीच्या पेटवण्यात बरोबर आपल्या जीवनातले दु ख व वाईट गोष्टीसुद्धा पेटून नष्ट होत असतात . तर आपण पहिल्यांदा आपल्या जीवनातल्या या वाईट गोष्टी कोणत्या काय पेटवायचे हेच समजून घेऊया . होळीच्या वेळीस आपल्याला पेटवायचे असेल किंवा होळी करायची असेल तर ती विभिन्न व्यसनांची करूया . आपल्या सभोवताली राहणाऱ्या लोकांना विभिन्न प्रकारचे व्यसनं जडलेले असतात. प्रत्येकाला व्यसन सोळा विषय वाटते मात्र ती सुटता सुटत नाही . भरपूर व्यक्तींना कुणाला दारूचे कुणाला गुटख्याचे पत्त्याची गांजाचे सिगारेटचे असे विभिन्न प्रकारची व्यसन असतात . या ओळीला आपण याच सगळ्या व्यसनांची होळी करूया व पेटवून दिल्या हे ठरवूया . गुटख्याच्या पुड्या सर्वांनी पेटवून द्यायचा तंबाखू गुटखा सिगारेटची पॉकेट हे सगळे पेटवून द्यायचे आहेत . म्हणजेच आजच्या दिवशी आपण निर्णय घ्यायचा की आपण या सगळ्या व्यसनांचा त्याग करत आहोत . यावेळी दिसणाऱ्या स्थानबद्ध बरोबर न दिसणारी सुद्धा व्यसनं माणसाला असतात ती म्हणजे राग द्वेष लोभ मोह मत्सर यासारखी व्यसने . आपल्याला जाणवतसुद्धा नसते या गोष्टींविषयी या ओळीला आपण निर्णय घेऊया की आपण या सर्व गोष्टींचा त्याग करूया . कुणाविषयी लोभ मत्सर द्वेष मी ठेवणार नाही . सर्वांशी प्रेमाने व आपुलकीनेच वागेल . जास्तीत जास्त वेळ मोबाइलवर ती न देता माझ्या मुलांना व परिवाराला देईल . मोबाइल हेसुद्धा व्यसन झालेला आहे . अवास्तव मोबाइलचा वापर हेसुद्धा एक व्यसनच आहे . या ओळीचा वेळेस अवास्तव वापर मी करणार नाही हेसुद्धा आपण सर्वांनी जाणीवपूर्वक योग्य निर्णय घेऊन आपले आयुष्य जगावे . धुलिवंदन साजरा करताना आपण विभिन्न रंगांचा वर्षाव करत असतो . त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात चांगल्या रंगांचा व इतरांच्या जीवनातसुद्धा सुखाचे रंग भरण्याचा निर्णय घेऊया . आपल्या संपर्कात असणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त प्रेम आपुलकी सहानुभूती देण्याचा प्रयत्न करून आज निर्णय घेऊया . करुणा काळामुळे या वेळेस आपण धुलीवंदन काळात रंग उधळू शकणार नाहीत . परंतु आपण गरजवंतांना मदत करून व गरजवंतांना योग्य ते सहकार्य करून त्यांच्या जीवनात सुखाचे रंग भरू शकतो, या काळात ज्या लोकांच्या घरांवर ती वैद्य किंवा इतर संकट आलेले असेल आपण त्या संकटाला आपल्यापरीने मदत करूया.जो खर्च आपण कृत्रिम रंग घेऊन उधळण्यात करणार होतो तोच खर्च आपण लोकांच्या जीवनात रंग भरण्यात सुखाचे रंग भरण्यात करूया. अशा पध्दतीने आपण होळी व धुलिवंदन साजरा करतात आपल्या सर्वांच्या आयुष्य सुखी व ही पृथ्वी स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही .

व्याख्याते व लेखक
डॉ.संतोष पाटील

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!