परतूर तालुका

परतूर तालुक्यात सतत धार पावसाने पपई उत्पादक अडचणीत


दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क दि ३
सतत आठ ते दहा दिवस पाउस झाल्या कारणाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस्मानपुर येथील शेतकरी गट क्र. ७,व 59/1 मध्ये पपई फळबाग दोन एक्कर असून बागेचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

झाडाला लागलेले फळे तुटून खाली पडलेले आहेत आणि पपईची झाडे उन्मळून पडल्यामुळे शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका एक्करला चाळीस ते पन्नास हजार रूपये खर्च झाले असता झालेला खर्च हि वसुल होने मुश्किल आहे आश वेळी शासनाने त्वरीत पंचेनामे करून नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी संतोष आश्रोबा राउत व आश्रोबा काशिबा राउत यांनी तहसिलदार परतूर व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक