परतूर तालुका

परतूरात पुन्हा दहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

दिपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क 2  रात्री उशिरा आलेल्या अहवालात परतूरातील पुन्हा दहा (10 ) जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 207 झाली असून यापैकी उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण 170 हे सर्व आज रोजी घरी गेलेले आहेत. तसेच सात (7) जणांचा कोरणामुळे मृत्यू झालेला आहे. कोरोना सक्रिय रुग्ण 30 रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान काल रात्री आलेल्या अहवालानुसार जय भवानी नगर परतुर येथील 60 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला, 31 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय पुरुष असे जय भवानी नगर मध्ये 7 कोरोना रुग्ण आढळले असून द्रोपदा नगर परतुर येथील 54 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, व 21 वर्षीय महिला असे एकूण 3 जणांचे अहवाला सह एकूण 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती परतुर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद जाहेद यांनी न्यूज जालना प्रतिनिधीस दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक