जालना तालुका

रामनगर येथील पशु चिकीत्सालयाचे नुतन ईमारतीचे व लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न

बबनराव वाघ,उपसंपादक

रामनगर : जालना तालुक्यातील रामनगर येथील पशु चिकीत्सालयाचे नुतन ईमारतीचे व लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन  डॉ.संजय गायकवाड प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त औरंगाबाद यांच्या हस्ते पार पाडले.यावेळी पशुरोग नियंञण कार्यक्रमा अंतर्गत लाळ खुरकुत लसीकरण करण्यात आले.

दवाखान्यात डॉक्टर नियुक्त करण्यात यावा यासाठी निवेदन देतांना तुकाराम बापु शेजुळ

यावेळी रामनगर, सावरगाव व परीसरातील ग्रामस्थांनी रामनगर येथील पशुचिकीत्सालयाला डॉक्टर उपलब्ध नसल्याने रिक्त पद भरती करण्यासंबधी निवेदन देण्यात आले. यावर यु कृ से संस्था रामनगर चे चेअरमन तुकारामजी शेजुळ, कृष्णादादा डोंगरे, नारायण शेजुळ, गणेश जुये आदींच्या सह्या करण्यात आल्या.

यावेळी कार्यक्रमाला डॉ.पी.डी. चैधरी औरंगाबाद , डॉ. दुबे जालना ‘ , डॉ.डी. एस . कांबळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ सांगुळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक