Breaking News
जालना तालुका

सोलगव्हाण येथील रेणुकामाता मंदीरा समोर वाढदिवसा निमीत्त केले वृक्षारोपण.

बबनराव वाघ,उपसंपादक जालना तालुक्यातील सोलगव्हाण येथील रेणुकामाता मंदिर परीसरात गुरुवारी वृक्षारोपण करण्यात आले.रामनगरचे सरपंच अड सोपान शेजुळ यांनी वाढदिवसाचे औचीत्य साधुन एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. केक कापुन अथवा पार्टी करुण वाढदिवस साजरा करण्यापेक्षा वृक्षारोपण करुण वाढदिवस साजरा केला. सोलगव्हाण संस्थानचे सुर्यकांतेश्वर बाबा यांच्या मार्गदर्षनातुन सोलगव्हाण येथील रेणुकामाता मंदिरा समोर नारळ, अशोका, बेलपञ व ईतर प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरणाचे संतुलन बिघडत असुन ते संतुलीत करण्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सोपान शेजुळ यांनी सांगीतले.
यावेळी सोलगव्हाणचे सरपंच उमाजी तेलंग, तुकाराम बोंद्रे, माजी सरपंच अशोक देशमुख,राजु पिठोरे,  विलासराव सराटे, बाबुराव गोळे, रंगनाथ शिंदे, सुंदरसिंग राजपुत, सुभानराव शिंगणे, सुधाकर उबाळे,गणेश ढाकणे, जनार्धन गोरे, बाबासाहेब शिंदे, अशोक गोरे, संदिप ढाकणे, गोरख महाराज शिंदे, भगवान बनसोडे, गणेश स्वामी गोरे, सोनु शिंदे, किसन भालेकर, जगनराव शिंदे, करणसिंग राजपुत, गजानन भालेकर, निवृत्ती गोरे, बाबुराव मखर, नामदेव सराटे आदी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक