Breaking News
जालना तालुका

सिंधीकाळेगाव येथे शरद जोशींना अभिवादन

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी)शाम गिराम
जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णूपंत गिराम म्हणाले, शरद जोशी हे शेतकर्याचे खरे नेते होते.त्यानी जिवनात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा सरकारच्या विरोधात आंदोलने केली. पुर्वी काळात शेतकर्याच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने ते अनेक वेळा रस्त्यावर उतरून सरकारला जागे करण्याचे काम केले.कांदा,ऊस,कापसाला भाव मिळावा यासाठीही आंदोलने केली. यावेळी माजी उपसभापती गणेश खरात,
जानकिराम गिराम, सखाराम, गिराम, विष्णुपंत गिराम, गिताराम जोगदंड, सुभाष गिराम, लक्षमन गिराम, सुदाम मुळे, जगन्नाथ मुळे, जनार्धन गिराम, पाडुरंग गिराम, अंकुश गिराम प्रभु खर्जुले, राम खर्जुले, श्रीपत गिराम, अशोक मगर, मुनशी सय्यद, विष्णु गिराम, उस्मान, सय्यद, आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक