बदनापूर तालुका

बदनापूर नगरपंचायत च्या मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन

: बदनापूर शहरातील मोक्याच्या जागेवर सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणीसाठी संघर्ष फाऊंडेशनची मागणी..!

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ दि ३

बदनापूर शहरातील सार्वजनिक स्वच्छताग्रह बांधण्यात यावे यासाठी संघर्ष फाउंडेशच्या वतीने बदनापूर मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देण्यात आले.

बदनापूर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा (मुतारी) अभाव असल्यामुळे ग्रामिण भागातून येणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिलांना लघुशंकेसाठी मोठी परवड सहन करावी लागत आहे. एकूणच यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे उघड्यावर लघुशंका करण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होऊन रोगराई होण्याचा देखील धोका आहे. बदनापूर शहरात खरेदी – विक्री, बँका, शासकीय कामकाजासाठी दररोज ग्रामिण भागातून शेकडो नागरिक येत असतात. अशा लोकांना लघुशंका करण्यासाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसणे हे आपल्या शहराच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. करिता आपण या महत्वाच्या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाच्या वतीने शहरातील चार मोक्याच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह (मुतारी) उभारावेत, अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येईल.

त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनानावर राहील, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघर्ष फाउंडेशचे सदस्य भरत पा.शेळके, सुभाष जगताप, विनोद आरसुड, आनंद इंदानी, राहुल जऱ्हाड, किशोर सिरसाठ, सुदर्शन वाळके, गणेश चव्हाण, संतोष वरकड, तुषार चेडे, ऋषी थोरात, माऊली पवार, प्रदिप उगलमूगले, गणेश जगताप, अर्जुन वेताळ, डाँ. नितीन जऱ्हाड, डाँ. मारुती चंदनशिव,सोपन कोळकर, इत्यादींची उपस्थिती होती..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक