Breaking News
भोकरदन तालुका

पिंपळगाव रेणुकाई-वालसावंगी-धावडा बस फेऱ्या सुरु करा !

पिंपळगाव रेणुकाई/प्रतिनिधी दि ३ भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे शेजारील बुलढाणा, औरंगाबाद जिल्ह्यातील बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी अद्यापही पिंपळगाव रेणुकाई-वालसावंगी-धावडा कडे येणाऱ्या बस फेऱ्या सुरु केल्या नाहीत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. भोकरदन तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी, धावडा, पारध बुद्रुक येथील नागरिकांना शासकीय कामासाठी नेहमीच भोकरदनला जावे लागते. त्यामुळेच पूर्वी या मार्गावरून सकाळी-दुपारी-संध्याकाळी अनेक बस फेऱ्या सुरू होत्या. याशिवाय काही मुक्कामी बसही असायच्या. दरम्यान, लॉकडाऊन नंतर सर्व वाहतूक बंद झाली आणि बस ची चाकेही थांबली. जवळपास सहा महिन्यानंतर आता सरकारने अनलॉक-४ घोषित केले आणि वाहतूक सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक मार्गावर लालपरी ची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. परंतु, जाफराबाद आगाराने भोकरदन कडून पिंपळगाव रेणुकाई कडे येणारी कोणतीही बस फेरी अद्याप सुरू केलेली नाही. त्यामुळे या बस फेऱ्या त्वरित सुरू कराव्यात. अशी मागणी पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायत कडून करण्यात आली आहे. यासाठी भोकरदन येथे आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी समाधान देशमुख, शिवनारायण आहेर यांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक