Breaking News
कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

जिल्ह्यात दिडशेपार कोरोना बाधीत रुग्णांची एकाच दिवशी भर

न्यूज जालना ब्युरो दि ३ –

जालना जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे यातच पॉझिटिव्ह रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

यात जालना जिल्ह्यात १५१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून २७५ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याने जिल्ह्याच्या हिशोबाने ही जमेची बाजू आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार ०२ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण सेवली नेर येथील ४२ वर्षीय पुरुष , मुरमा ता.घनसावंगी येथील ४५ वर्षीय पुरुष आहे .

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या अहवालात जालना शहरातील चौधरी नगर ०२ , पेन्शनपूरा ०३ , इंदिरा नगर ०७ , सिव्हीलहॉस्पीटल ०१ , नरिमन नगर ०५ , छत्रपती कॉलनी ०२ , रामनगर ०२ , लक्कडकोट ०१ , मधूबन कॉलनी ०१ , म्हाडा कॉलनी ०१ , शनिमंदिर ०२ , तपोवन ०२ , फत्तेपूर ०५ , खंडाळा ०१ , कोठा जहागीर ०१ , भोकरदन ०३ , सिरसगांव ०१ , कारला ०१ , पिंपळगांव ०४ , तिर्थपूरी ०२ , घनसावंगी ०२ , अरगडे गव्हाण ०४ , पिंपरखेड ०१ , राजेवाडी ०३ , वाघाळा ०१ , मंठा ०१ , सोनदेव ०३ , पिंपळवाडी ०१ , माहोरा ०१ , शहागड ०१ , सिंदखेडराजा ०४ , जायकवाडी ०१ , देवूळगांव राजा ०१ , अंबड ०२ , फुलबाजार ०१ , इंदेवाडी ०१ , अकोला देव ०१ , नानेगांव ०१ , जयभवानी कॉलनी परतूर ०७ , द्रोपदानगरी परतूर ०३ , चिंचोली सांगळे ०१ , एमआयडीसी ०१ , ढोरपूरा ०१ , भोकरदन ०१ , रानमळा ०१ , ढगी ०१ , सिनगांव जि.हिगोली ०१ , अकोला बदनापूर ०१ , निमागांव ०१ , वसुंधरा नगर ०६ , वरखेडी ०१ , लक्ष्मीनगर ०१ , नळगल्ली ०१ , जवसगांव ०१ , तिर्थपूरी ०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे १०७ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ४४ व्यक्तींचा अशा एकुण १५१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , कोवीड केअर सेंटरमधील २७५ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक