जालना जिल्हालाइफस्टाइल

अखेर मिळाले ओ निघेटिव्ह रक्त ,जालन्यात रक्तदान करून जोपासली बांधिलकी

सामाजिक दायत्व दाखवत रक्तदान करून जोपासली बांधिलकी

न्यूज जालना ब्युरो दि ३ सप्टेंबर

दोन दिवसांपासून रक्तासाठी अडचनीत असलेल्या पळसखेडा येथील अकाशाला रक्तदान देण्यासाठी एका होमगार्डने सामाजिक दायत्व दाखवत रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

जालना तालुक्यातील पळसखेडा येथील आकाश जाधव हा थालेसीमियाग्रस्त आहे. त्याला ओ निगेटिव्ह रक्ताची गरज आहे.परंतु जिल्ह्यात रक्ताचा प्रचंड तुडवडा आसल्याने रक्त मिळणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीमध्ये गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुपचे गणेश चौधरी यांना या बाबतची माहिती मिळाली.

गणेश चौधरी यांनी लागलीच रक्त कुठून व कसे मिळेल यासाठी धावाधाव केली. त्यांनतर गणेश चौधरी यांचे मित्र होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले गणेश (लक्ष्मीकांत) पैंजने यांना रक्तदान करण्यासंदर्भात प्रोत्साहीत केले.

गणेश चौधरी यांनी पैंजने यांना फोन केला आणि त्यांनी तात्काळ कुठे येऊ आणि कधी रक्तदान करायचे सांगा असे सांगितले. नंतर लगेच जनकल्याण रक्तपेढीमध्ये जावून पैंजने यांनी रक्तदान केले.

यामुळे दिवसापासून रक्तासाठी अडचणीत असलेल्या आकाशला आज वेळेवर रक्त मिळाले. कोरोनाच्या काळात दिवसरात्र एक करून काम करणारे व प्रसंगी रक्तदान करून आकाशला मदत करणारे गणेश पैंजने यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक भूमिका निभावली आहे.

त्यांच्या या सामाजिक कार्याला गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुप जालना कडून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक