जालना जिल्हा

स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी थांबवा लोकहित संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना साकडे

न्यूज जालना ब्युरो दि ३ सप्टेंबर

ग्रामिण भागातील राशनकार्ड धारकांना जुलै महिन्यातील मोफत मिळणारे अन्नधान्य मिळालेले नाही पुर्ण तालुक्यातील सर्व राशन दुकानदारांमध्ये अंत्योदय योजनेचे साखर तसेच कडधान्य एकदा देखील मिळाले नसून या संपुर्ण भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करुन संबंधीत अधिकारी व राशन दुकानदार यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी लोकहित संघटनेकडून जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे करण्यात आली आहे.

जालना ताल्युक्यातील जालना व शहरी भागातील राशन दुकानात लॉकडाऊन मुळे वाटप करण्यात येणारे राशन जुलै महिन्यातील अन्नधान्य वाटप न करता काळ्या बाजारात विकल्या गेले आहे. त्यामुळेच जनतेला जुलै महिन्यातील राशन मिळाले नाही. तसेच अंत्योदय योजनेचे साखर एकदाही मिळालेले नाही व कोणत्याही प्रकारची दाळी पुर्ण लॉकडाऊनमध्ये एकदाही मिळालेले नाही.

या प्रकाराची तात्काळ चौकशी झाली पाहिजे कारण हा पुर्ण राशनचा माल काळ्या बाजारात विकल्या गेलेला आहे यामध्ये अधिकारी व दुकानदार यांच्या संगनमताने हा पुर्ण भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे, येत्या आठ कारवाई करा नसता अखिल भारतीय लोकहित संघटनेच्या वतीने लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल. याची पुर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन पुरवठा अधिकारी इत्यादींची राहील. तसेच भ्रष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करुन निलंबीत करण्यात यावे. असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

तसेच चालु महिन्यात मक्का राशन मध्ये येणार अशी चर्चा चालु आहे तर मक्का राशनमध्ये आणु नये कारण मक्का खाणारे लोक आपल्या जिल्ह्यात आढळुन येत नाही. तसेच या महिन्याचे राहिलेला माल तात्काळ वितरण करण्यात यावा. यावेळी निवेदन देताना सय्यद अफसर, बशीर खान, नितिन जाधव, शेख शकील, अशपाक पटेल, इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक