जाफराबाद तालुका

मोहोरा गाव अंधारात ,महावितरणचे दुर्लक्ष

विजवितरण कंपनीचा भोंगळ कारभार

माहोरा : रामेश्वर शेळके दि ३

जाफराबाद तालुक्यातील मोहोरा गावात रोहित्र जळून अनेक दिवस होऊनही विजवतरणचे याकडे दुर्लक्ष आहे यामुळे संपूर्ण गाव हे अंधारमय झाले आहे रोहित्र लवकरात लवकर बदलून देण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.

येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. विजेच्या समस्येवरून अधिकारी व उद्योजक, राजकीय व्यक्ती यांच्यात शाब्दिक संघर्ष होत आहे; परंतु या संघर्षात सामान्य नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला आहे. माहोरा शहरातील जळालेले व बंद रोहित्र त्वरित बदलून देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे

परिसरातील सर्वसामान्यांना अंधारात रात्र काढावी लागली. महावितरणच्या बेशिस्त कारभार व काही आर्थिक लाभाच्या अपेक्षेमुळेही रोहित्रांचे काम जाणीवपूर्वक लांबविले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महावितरण विभागाने या समस्येकडे त्वरित लक्ष देत शहरातील जळालेले रोहित्र त्वरित बदलून द्यावे अशी मागणी नागरिकांतुन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक